धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट?

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी : धान उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी शासनाने धान खरेदी केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली असली तरी बहुतांश धान खरेदी केंद्रांवर घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून शेतकºयांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पनन विभागाने तहसीलमध्ये, सहकारी भात गिरणी संस्था आणि तालुका खरेदी विक्री समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अनेक केंद्रांवर धान खरेदी ला सुरवात केली आहे , तसेच राजकीय आश्रय प्राप्त संस्थांना धान खरेदी केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी स्थानिक खरेदी-विक्री समितीच्या एका पदाधिकाºयाने धान खरेदीतील कथीत घोटाळ्यांची तक्रार केल्यानंतर काही संस्थांवर धान घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, तपासादरम्यान त्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. तालुका खरेदी विक्री समितीचा पदाधिकारी असल्याने व राजकीय आश्रय प्राप्त या पदाधिकाºयाने या वर्षी स्वत:च्या हितासाठी धान खरेदीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करीत असल्याची आणि गोदामांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त धान खरेदी केल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गात चर्चेला आहेत. शेतकºयांनी गडेगाव, मोरगाव राजेगाव ,मानेगाव सालेभाटा, सेलोटी, लाखोरी, पिंपळगाव सडक, पोहरा येथील खरेदी केंद्र व गोडाऊन यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करून सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. अवकाळी पाऊस व धान खरेदी केंद्र संचालकांच्या अतिरेकामुळे शेतकºयांचे बेहाल झाल्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.

धान खरेदी केंद्र संचालकांकडून आधारभूत धान खरेदी केंद्राच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. धान खरेदीच्या पूर्वीच परिसरातील गोडाऊन हजारो क्विंटल धानाने फुल झाल्याने केंद्र संचालकांच्या कार्यप्रणालीवर शेतकºयांनी प्रश्न उपस्थित केले आहे. शासनाने शेतकºयांच्या हितासाठी धान खरेदी करण्यासाठी केंद्र संचालकांना धनाचे पोते, हमाली, व घट निर्धारित करून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याआहेत मात्र केंद्र संचालक शेतकºयांकडून हमालीचे पैसे वसूल करून घट दाखविण्यासाठी पाच किलो धान अधिक चे घेत असून शेतकºयांची सर्रास लूट करीत आहेत. या माध्यमातून खरेदी केंद्र संचालक शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गडेगाव येथे धान खरेदी केंद्राची परवानगी मिळाली मात्र धान खरेदी ही मोरगाव व मानेगाव येथील एका राईस मिल मध्ये सुरू असुन यात गैरप्रकार होत असल्याची ओरड शेतकºयांमध्ये आहे. तर खरेदी केंद्र संचालकाने मानेगाव येथील महामार्गावरील राईस मिलच्या गोडाऊनमध्ये तसेच मोरगाव / राजेगाव येथील व गडेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या नावावर भाड्याने घेतलेल्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात हजारो क्विंटल धान खरेदी करून साठवणूक केल्याने सदर धान खरेदीचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे. या धान खरेदी प्रकरणाची चौकशी पारदर्शीपणे वरिष्ठ अधिकाºयांनी केल्यास मोठा धान खरेदी प्रकरण घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय आश्रय प्राप्त असल्याने सदर प्रकरणाकडे पणन विभाग मौन बाळगून असल्याचेबोलले जात आहे. साकोली व लाखनी तालुक्यातील बहुतांश घान खरेदी केंद्र संचालकांनी थेट शेतकºयांच्या घरी जाऊन धान खरेदी करण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. शेतकºयांना पूर्वीच ध्यानाचे खाली पोते देऊन त्यांच्या घरी ट्रॅक्टर अथवा पिकप वाहन पाठवून धान खरेदी करण्याची स्पर्धा धानकेंद खरेदी केंद्र संचालकांमध्ये लागली आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती पणन विभागाला असून पणन विभाग मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आपली भूमिका बजावत असल्याचे चित्र आहे. धान खरेदी केंद्राची व गोडाऊनची पाहणी करणारे पणन विभागाचे फिरते पथक पाहणी दरम्यान खरेदी केंद्र संचालकांना मॅनेज प्रवृत्तीच्या आधारावर गैरव्यवहार करण्यासाठी सूट देत असल्याचे बोलले जात आहे. यात मात्र शेतकºयांची व शासनाची कोट्यावधी निधीची लूट होत असून वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांनी व जिल्हाधिकाºयांनी चौकशी समिती नेमून प्रामाणिक रित्या तपास केल्यास धान खरेदी केंद्रावर होत असलेला गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *