प्रचाराची रणधुमाळी,’लक्ष द्या, अन् मत द्या’

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नमस्कार, मी या पदासाठी उमेदवार आहे. जरा लक्ष द्या, अन् मत द्या, अशी आर्त हाक उमेदवार मतदारांना करीत आहेत. असे चित्र सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे आता ५७ सरपंच पदाची निवडणूक घेतली जाणार आहे. तसेच सालेबर्डी येथील सात सदस्य अविरोध निवडून आले. तसेच नवेगाव /धुसाळा येथील प्रभाग १ मधून स्वाती भलावी, तेजस्विनी पुंडे, प्रभाग २ मधून प्रतिभा मेश्राम, गुलाब पुंडे, प्रभाग ३ मधून प्रतिमा बनसोड बिनविरोध निवडून आले आहेत. खैरलांजी ग्रामपंचायत मधून प्रभाग एक मधून गौरीशंकर बोरकर प्रभाग २ मधून वैशाली मंडले, प्रभाग ३ मधून सुधा लेदे बिनविरोध निवडून आले आहेत. असे एकूण १५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ४६३ सदस्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एक आठवडा शिल्लक आहे. सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवार असलेल्या उमेदवारांनी आपल्या पॅनलचे फलक गावभर लावले आहेत. उभे असलेले सर्व उमेदवार आपल्या पॅनलसह संयुक्त प्रचारावर भर देत आहेत. उमेदवार मतदारांच्या दारात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत आहेत.

विशेष करून धान पिक कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळ अशी भेटीची वेळ पॅनलच्या उमेदवारांनी ठरवलेली आहे. काही उमेदवार तर दुपारी वैयक्तिक भेटी घेऊन नाव व चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवत आहेत. गावात फेरफटका मारत दादा, भाऊ, काका अशा हाका देऊन माज्याकडे लक्ष द्या,मला आशीर्वाद द्या अशी हात जोडून मतदान मत मागत सुटले आहेत. आमची पॅनल कशी सक्षम आहे हे पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधल्या जात आहेत.

अपक्ष उमेदवाराही प्रचाराला लागले आहेत. गावात वाहन फिरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीतील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना खाण्यापिण्याची आरास कमी पडू द्यायचीच नाही. त्यामुळे गावा शेजारच्या विविध हॉटेलमध्ये पार्ट्यांची रेलचेल दिसून येत आहे. चार महिला उमेदवारांनी घेतला पुरुष उमेदवारांशी पंगा प्रवर्गात आरक्षण नसलं की त्या ठिकाणी महिलांना उमेदवार करण्याची पुरुष पुढाºयांची मानसिकता नसते. पण, आम्ही कमजोर नाहीत.आम्हीही पुरुषांच्या विरोधात लढू शकतो. या आत्मविश्वासाने चार ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठीमहिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांशी पंगा घेतला आहे. या लढतीची उत्सुकता उत्कट झाली असून सामान्य मतदार व राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.