साकोलीत संशयास्पद व्यक्तीचा वावर?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरातील एका नर्सिंग होम येथे बुधवार २० ला एक संशयास्पद व्यक्ती प्रवेश करून तेथे पाळत ठेवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. या अनोळखी व्यक्ती बद्दल संशय आल्याने तात्काळ साकोली पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांनी फुटेज हाती घेऊन सखोल तपास सुरू केला असून नागरीकांना सदर इसम दिसल्यास ताबडतोब पोलीस ठाणे येथे कळविण्याचे आवाहन केले आहे. एम.बी.पटेल कॉलेज रोडवर गायत्री नर्सिंग होम येथे बुधवार २० डिसें. सायं.५:३६ दरम्यान अनोळखी इसम संशयास्पद स्थितीत प्रवेश करून इतरत्र पाहणी करीत रूग्णालयाच्या वरील डॉ. रविंद्र कापगते यांच्या निवास कक्ष व दूसºया मजल्यापर्यंत गेला. ही घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली.

सायंकाळी उशिरा हे फुटेज दिसताच याची सुचना डॉ. रविंद्र कापगते यांनी साकोली पोलीसांना दिली. तात्काळ पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात हे चमुसह घटनास्थळी गायत्री नर्सिंग होम येथे जाऊन सीसीटीव्ही तपासले. सदर अनोळखी इसमाच्या अंगात काळा फुल शर्ट, हलका सिमेंट रंगाचा पॅन्ट, पायात गहु रंगाची चप्पल आणि हलके टक्कल पडलेला असून दिवसा पाळत ठेवून रात्रीबेरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने मागावर असल्याच्या अंदाज वर्तविण्यात आला आहे. सदर अनोळखी संशयास्पद व्यक्तीची फोटो पोलीसांनी सोशल मीडिया वर दिली असून या वर्णनाचा अनोळखी इसम आढळून आल्यास तातडीने साकोली पोलीस हेल्पलाईन – ०७१८६ २३६१३३ यावर संपर्क साधून माहिती द्यावी असे पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *