घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : घरातील क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीची बचावाची झाल्याने नवºयाने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम टोयागोंदी येथे घडली. आशा केवल नेवरा (३२, रा. टोयागोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले. आशाचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. आशाला केवल पासून एक मुलगा ९ वर्ष व एक तीन वर्षाची मुलगी आहे. आशाही आठ दिवसापूर्वी माहेरी राहून १० डिसेंबर रोजी सासरी टोयागोंदी येथे आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी केवलने आपले सासरे गोपाल सूरदेव निर्मलकर यांना फोन करून आशाला आठ-पंधरा दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवत आहे, असे म्हटल्यावर कोणासोबत पाठवता, असे सासºयाने विचारले. बस्स.. मी पाठवतो असे बोलून केवल गप्प राहीला. त्यावर सासरा गोपाल निर्मलकर यांनी माज्या मुलीला एकटी पाठवू नका; आपण सोडून द्या असे म्हटले. एवढे बोलल्यावर केवलने आशाला फोन दिला.

गोपाल यांनी आशा सोबत चर्चा केल्यावर मला एकटीच माहेरी जायला सांगत आहेत आणि माज्या मुलांनाही माज्यासोबत पाठवत नाही असे आपल्या वडीलाला सांगितले. मुले कुठे आहेत हे विचारल्यावर त्या मुलांना सासू फिरायला घेऊन गेली असे आशाने सांगितले. त्यानंतर सासरा गोपाल यांनी फोन आपल्या पत्नी रमौतीन यांच्याकडे फोन दिला. मायलेकीच्या बोलण्यातही मुलांसोबत पाठवतील तर मी माहेरी येईल अन्यथा मी माहेरी येणार नाही असे आशाने म्हटले. दुपारी ३:१५ वाजता आशाच्या सासºयाने नवीन नंबरने फोन करून आशाचा खून झाल्याची माहिती दिली. आशाचे माहेरचे मंडळी रात्री ९ वाजता टोयागोंदी येथे पोहचल्यावर दुपारी दीड वाजता आशाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आली. आशाचे वडील गोपाल सूरदेव निर्मलकर (६५, रा. उरई-डबरी, डोंगरगडछत्तीसगड) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *