दुकानदारांनो, इंग्रजी पाटया काढून मराठी लावा, अन्यथा कारवाई होणार

प्रतिनिधी / भंडारा-पत्रिका गोंदिया :- होय, हा इशारा गोंदिया जिल्हयातल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नव्हे तर शासकिय विभागाचा आहे. तशी ही गोंदिया जिल्हयातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटले तर यांची संगठन शक्ती इतकी खिळखिळी आहे की त्यांना मागील कोणतेही मोठे आंदोलन केव्हा केले हे त्यांच्या पदाधिकारी किंवा जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा माहिती नसणार, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावावार आपली ठेकेदारी चांगली चालावी या उद्देशाने ते नावापुरता पक्ष चालवितात. पक्षाच्या ध्येय धोरणांशी त्यांचा लांब पर्यंत कोणताही वास्ता आहे की नाही हेच कळत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व आस्थापना, दुकानावर मराठीतच पाटया हव्या या मुद्दयाला घेवून मोठे आंदोलन केले होते. त्यावर अखेर सुप्रीम कोटनि सुद्धा आपली मोहर उमटवली व आदेश काढले की महाराष्ट्राती कोणत्याही आस्थापना व दुकानावरील पाटया या मराठी भाषेतच हव्या, त्याला आता कायद्याचे स्वरूप सुद्धा मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर व तो कायद्यात रूपांत झाल्यानंतर राज्यातील जिल्हयातील मनसे आक्रामक झाले कोल्हापूर, मीरा-भाईंदर, सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक आदि जिल्हयात तर इंग्रजी अक्षर दुकानांना काळे सुद्धा फासले होते पण या प्रकारचा कोणताही आंदोलन गोंदिया जिल्हयात मनसे द्वारे करण्यात आलेला नाही.

एकंदरित येथे आंदोलन करण्याइतपत कार्यकर्तेच मनसेत आहेत की नाही हाच कळीचा मुद्दा आहे. आणि जर असतील तरीही त्यांना अश्या प्रकारच्या सुंदर उपक्रमाची अंमलबजावणीच्या आंदोलनाकरिता प्रेरित करणे हे सुद्धा येथील जिल्हाध्यक्षांना जमले नसणार त्यामुळेच गोंदिया शहरात मनसे चे आंदोलन कधी दिसून आले नाही. गोंदिया नगर परिषदेतील मुख्याधिकारी व प्रशासक करण चौहान यांनी गोंदिया जिल्हयातील इंग्रजी प्रेमी दुकानदारांना हा शासकिय इशारा दिलाआहे. तसेच या संदर्भातील आशयाचे फलक गोंदिया शहरातील मुख्य चौकात सुद्धा लावून दिलेल्या काळमयदित दुकानदारांनी आपल्या दुकान, आस्थापना व इतर संबंधित जागेतील इंग्रजीत असलेल्या पाटया येत्या दो. महिन्यात लवकरात लवकर मराठी भाषेत कराव्या या बद्दल ची सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलक काढून मराठी अक्षरात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व इंग्रजी पाटया लावलेल्या दुकानदारांना नोटीस देण्यात येत असून कर्मचारी तालुकास्थळी जाउन नोटीस बजावणार असल्याचे ही मुख्याधिकारी करण चौहान यांनी सांगितले. तसेच ढड ऋ1 दुकानावरील पाटया मराठी अक्षरात लावल्या नाहीत तर १९१८ च्या ३५ -१ क नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *