आरोपी सोंटूच्या विरोधात ४५०० पानांची आरोपपत्र

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नागपूर येथील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आॅनलाइन गेमिंग फसवणूक करणारा आरोपी सोंटू उर्फ अनंत नवरतन जैन रा. गोंदिया याच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनी तब्बल साडेचार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिस सुत्रानुसार सोमवारी नागपूर येथील न्यायालयात ४५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सोंटूच्या आॅनलाइन फसवणुकीची मोडस आॅपरेंडी, त्याचे नेटवर्क, बँक खात्याचे तपशील, अग्रवालच्या बँक खात्यातून सोंटूच्या बँक खात्यातील पैशांचे व्यवहार, सायबरचा तपशील, फॉरेन्सिक अहवाल, त्याचे कॉल लॉग, कॉल रेकॉर्डिंग आदी पुराव्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. आॅनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात गेमिंग प्लॅटफॉर्मद्वारे तक्रारकर्ते विक्रम अग्रवाल यांची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तपासाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नागपूर पोलिसांनी २२ जुलै रोजी आरोपी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानावर छापा टाकला. छाप्यात पोलिसांना १७ कोटी रुपये रोख, १४ किलो सोने आणि २९४ किलो चांदी, असा तब्बल २७ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान सोनू फरार होता. त्याने नागपूर येथील न्यायालयात १६ आॅक्टोबर रोजी आत्मसमर्पण केले. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

दरम्यान शहरातील डॉ. बग्गा, अ‍ॅक्सिस बँक गोंदिया शाखेचे व्यवस्थापक खंडेलवाल आणि कोठारी यांच्यासोबत कट रचल्याबद्दल सोंटू जैन यांच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला. ज्यामध्ये अ‍ॅक्सिस बँक गोंदियाच्या शाखेत डॉ. गौरव बग्गा यांच्या नावाने तीन नवीन लॉकर उघडणे आणि जैन कुटुंबीयांच्या लॉकर्समधून कोट्यवधी रुपये आणि सोने डॉ. बग्गा यांच्या नवीन स्थापित लॉकर्समध्ये हस्तांतरित करणे समाविष्ट होते. डॉ. बग्गा यांच्या लॉकरमध्ये सोने आणि रोख यशस्वीपणे स्थानानंतर केल्यानंतर खंडेलवाल आणि डॉ. बग्गा यांनी ३० जुलै रोजी कोठारी यांच्याकडे मौल्यवान वस्तू सुपूर्द केल्या. २० आॅक्टोबर रोजी शहर पोलिसांनी डॉ. बग्गा यांच्या घरावर छापा टाकून ३ किलो सोने आणि १.३५ कोटी रोख रुपये जप्त केले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपी सोंटूविरोधात विविध पुरावे गोळा करून सोमवारी तब्बल साडेचार हजार पानांचे आरोप पत्र न्यायालयात दाखल केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *