गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्प

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन सुरु झालेली गोंदिया-तिरुपती विमानसेवा खराब वातावरण आणि कमी दृश्यतेअभावी शुक्रवारी (दि.२९) सलग सहाव्या दिवशी रद्द होती. यामुळे गोंदियाहून तिरुपती आणि हैद्राबादला जाणाºया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. इंडिगो विमान कंपनीने गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन गोंदिया-हैद्राबादतिरुपती या प्रवासी विमान वाहतूक सेवेला १ डिसेंबरपासून सुरुवात केली. जवळपास २१ दिवस ही सेवा सुरळीतपणे सुरु होती. पण मागील सहा दिवसांपासून खराब वातावरण व कमी दृश्यतेअभावी ही विमानसेवा ठप्प पडली आहे. डीजीसीएने ५ हजार मीटर दृश्यतेशिवाय टेकआॅप आणि लॅडिंग करण्यास मनाई केली आहे. तर सध्या तीन ते साडेतीन हजार मीटर दृश्यता असल्याने विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तिरुपतीहून गोंदियाला येणारे येथे उतरु शकले नाही आणि गोंदियाहून तिरुपती जाणाºया विमानाचे उड्डाणसुध्दा झाले नाही. शुक्रवारी सुध्दा हीच समस्या कायम होती. त्यामुळे गोंदियासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तर अनेक प्रवाशांना आधी बुक केलेले तिकिट रद्द करावे लागले. त्यामुळे त्यांना त्यांचा नियोजित कार्यक्रम सुध्दा रद्द करावा लागला. जेव्हापर्यंत दृश्यतेची अडचण दूर होणार नाही तेव्हापर्यंत ही सेवा पुर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.