वाढू लागला ‘स्क्रब टायफस’… खबरदारी द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पावसाळा सुरू होताच अनेक आजारांचा प्रसार होतो. राज्यातील काही भागात स्क्रब टायफस आजाराचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागातर्फे आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृति कली आहे. नागरिकांनीही सजग राहून स्क्रब टायफसपासुन खबरदारी द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे. जंगलव्याप्त, ग्रामीण व शहरी भागात आढळून येणाºया विशेषता गाजरगवतावर आढळणाºया किड्याने चावा घेतल्याने स्क्रब टायफस रोगाचा प्रसार होतो. हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील आॅरियंटा सुट्सुगामुशी नावाचा जिवाणू मानवी शरीरात गेल्यावर हा आजार होतो. ट्रॉम्बिक्युलिड माईटसचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात, ते चावल्यामुळे हा आजार होतो. झाडे-झुडूप, गवत वाढलेले असते अशा ठिकाणी हे चिगर माईट्स जिवाणू असतात. जंतू चावल्यास व्यक्तीला हा रोग होतो.

या आजाराचे कीटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे अशा भागात आढळतात. हे कीटक लाल, शेंदरी पिवळ्या रंगाचे असतात. पूर्ण वाढ झालेली कीटक चावा घेत नाहीत. लारवा स्वरूपात असलेले कीटकच चावा घेतात. शेतात, जंगलात काम करणारे मजूर, शेतकरी, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण ३० टक्के आहे. हा जिवाणू शरीरात गेल्यावर ८ ते १० दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होऊन मरण पावतात. त्यामुळे हा आजार होऊ किंवा पसरू नये म्हणुन सवार्नी काळजी घेणे महत्वाचे असल्याचे डॉ वानखेडे यांनी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *