नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी असुन सदर कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संघटनेतर्फे आज दि.४ जानेवारी रोजी भंडारा पवनी मार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी पवनी पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली.यावेळी आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले. रस्ता रोको आंदोलनात जय संघर्ष चालक मालक संघटना पवनी तालुका महिला आघाडी अध्यक्ष शोभनाताई गौरशेट्टीवार , पवनी तालुका अध्यक्ष संतोष दुम्पावार , शंकर नागपूरे, विष्णु नागपूरे, खमलेश्वर तिसरे, हर्षल लिखार, आनंद केले, विठोबा काटेखाये, जावेद खान, मयुर तलमले, रशिद पठाण, देवराम पवनकर, सतिश बावनकर सहभागी झाले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *