जिल्हाधिकाºयांनी घेतला लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज नोडल आॅफिसरची बैठक घेवून पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील मतदारांमधे जनजागृती, नवमतदार नोंदणी, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाºयांनी आपले दायित्व पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी आजच्या बैठकीत दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने आज ही तिसरी बैठक होती. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम पुढील काही दिवसात घोषित होईल. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाने आजपासूनच इलेक्शन मोडमध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज येथे दिले. परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकाºयांसोबत, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत पिसाळ आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकासंदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. या समित्यांचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

बैठकीत विभागवार आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व सोळा नोडल अधिकाºयांनी त्यांना नेमून दिलेल्या समितीच्या कामाची सादरीकरण करणारे पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमानुसार आणि निर्देशानुसार निवडणुकीतील नियुक्त अधिकाºयांनी आपले कर्तव्य पार पाडावे, त्या संदर्भात काहीही अडचण आल्यास चर्चेने अडचणी सोडवावेत किंवा वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. निवडणुकीच्या कामात कोणीही हलगर्जी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी पुढील काही दिवसांमध्ये मतदार यादी अद्यावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण यंत्रणा कार्यरत करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.