सरपच निवडीला विलब का?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या गोंडीटोला ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे सदस्य उपलब्ध असतांना निवड प्रक्रियेला विलंब करण्यात येत आहे. ही प्रक्रिया लांबणीवर जात असल्याने गावातील विकास कामे प्रभावित झाले आहेत. याशिवाय गत वर्षांपासून संगणक परीचालकांचे पद रिक्त आहे. यामुळे दाखल्यासाठी गावकºयांची धावपळ सुरू आहे. अन्य गावातील संगणक परीचालकांचे घर गाठावे लागत आहे. पद रिक्त असल्याची माहिती महाआॅनलाईन केंद्राला देण्यात आली आहे. गोंडीटोला ग्रामपंचायतच्या इतिहासात कटू अनुभव गावकºयांनी अनुभवले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद अनुसूचित जाती सर्वसाधारण करीता राखीव करण्यात आले. यात ७ पैकी सरपंच आणि अन्य दोन सदस्य शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणात पदमुक्त करण्यात आले. प्रशासकीय कारभार अल्पमतात नसल्याने सरपंच पदाचा प्रभार उपसरपंचाला देण्यात आलेला आहे. प्रशासकीय कारभार बहुमातात असून या ४ सदस्यांत १ सदस्य अनुसूचित जाती राखीव जागेवरून निवडून आलेला असल्याने सरपंच पदाचा दावेदार आहे. परंतु सरपंच पदाचे निवडणूक प्रक्रियेला विलंब होत असल्याने कार्यरत असणाºया सदस्यांवर अन्याय होत आहे. यामुळे गावात सरपंच पदाची निवड प्रक्रिया जलद गतीने घेण्याची ओरड सुरू झाली आहे. दरम्यान सरपंच पदाचा प्रभारदेण्यात आला असल्याने गावातील कामे अडचणीत येत आहे.

सरपंच पदाचा सदस्य दावेदार कार्यरत ४ सदस्यांत उपलब्ध आहे. यामुळे तहसील कार्यालय मार्फत सरपंच पद निवड प्रक्रिया घेण्याची मागणी माजी उपसरपंच हिरालाल शहारे यांनी निवेदनातून केली आहे. सरपंच पद प्रभारी असले तरी संगणक परीचालकांचे पदही गेल्या वर्षांपासून रिक्त आहे. संगणक परीचालकांची नियुक्ती पोलीस पाटील पदावर झाली आहे. यामुळे हे पद रिक्त झाले आहे. यामुळे गावकºयांना डिजिटल दाखल्यासाठी भटकावे लागत आहे. संगणक परिचालक पदाचे पद भरतीसाठी गावांतील काही तरुणांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. महाआॅनलाईनच्या वेबसाईटवर ही नोंद करण्यात आली आहे. परंतु या अर्ज करणाºया उमेदवाराना परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात आले नाही. गावातील तरुण या पदाला मुकले जात आहेत. दरम्यान ग्रामपंचायतला संगणक परिचालक देण्यात आले नाहीत. संगणक परिचालक नसल्याने अन्य गावातील परीचालकांचे डिजिटल दाखल्यासाठी दार ठोठावे लागत आहे. ग्रामसेवकाना अन्य गावाचा प्रभार असल्याने संलग्नित गावांतील संगणक परीचालकांची मदत घेतली जात आहे. डिजिटल दाखल्यासाठी गावकºयांना धावपळ करावी लागत आहे. पंचायत समिती स्तरावरून संगणक परिचालक नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. सरपंच पद निवड प्रक्रिया आणि संगणक परिचालक पद भरती तात्काळ घेण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *