मदतनीस कमलताइ गोधळ याना अगणवाडी कमचारी व गावकºयाचा अखरचा लाल सलाम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अंगणवाडी कर्मचारी मदतनीस कमलताई विजय गोंधळे यांचा अपघाती निधन झाल्याबद्दल त्यांना दिनांक ९ जानेवारी २०२४ ला दुपारी बारा वाजता सामान्य रुग्णालय परिसरात अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने राज्य अध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड हिवराज उके, अध्यक्षा सविता लुटे, मंगला गजभिये, मंगला रंगारी, छाया क्षीरसागर, कुंदा भदाडे, गौतमी मंडपे, शालू कापसे, अलका बोरकर, रिता लोखंडे, जयनंदना कांबळे, विजया काळे, अनिता घोडीचोरे, किसना बाई भानारकर, कल्पना साठवणे, पुष्पा हुमणे, शामकला सातव आदींच्या उपस्थितीत अखेरचा लाल सलाम करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्व अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी मासळ तालुका लाखांदूर येथे अंतिम संस्कार समारंभात सहभागी झाल्या. मासळ येथे स्मशानभूमीत सुद्धा सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेमध्ये मासळचे सरपंच प्रणय लांजेवार, पोलीस पाटील रामकृष्ण ब्राह्मणकर, तंटामुक्ती अध्यक्ष राधेश्याम कठाणे, उपसरपंच पुरुषोत्तम दोनोडे, प्रदीप लांजेवार, शिक्षकवृंद, संस्थापक गणपत टिचकुले, विठ्ठल सार्वे, वाय. के. घोनमोडे तसेच मोठ्या संख्येत सर्व अंगणवाडी कर्मचारी तसेच गावकरी महिला पुरुष उपस्थित होते. दोन्ही ठिकाणच्या श्रद्धांजली सभेचे संचालन आयटक चे जिल्हा सचिव व अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.

श्रद्धांजली सभेत बोलतांना कॉम्रेड हिवराज उके म्हणाले या मृत्यूला राज्य शासन जबाबदार असून शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या न्याय मागण्या वेतनश्रेणी, मानधन वाढ, वैद्यकीय रजा, विमा इत्यादी मागण्या पूर्ण करून संप संपावला पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाºयांना दिलासा दिला पाहिजे असे असे मत त्यांनी व्यक्त केले. अन्यथा यापुढे अंगणवाडी कर्मचारी आंदोलन तीव्र करतील आणि याला शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संप मागील ३७ दिवसापासून भंडारा जिल्हा परिषदेच्या समोर सुरू आहे, परंतु अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दर दिवशी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी भंडारा जिल्हा परिषद समोरील संप आंदोलनाच्या मंडपामध्ये सहभागी होत असतात. दिनांक ८ जानेवारीला कमलताई गोंधळे सुद्धा संपात सहभागी झाल्यानंतर आपल्या गावी एसटी बसने परत जात असताना पहिला श्रीनगर जवळ रस्त्यावर बस उसळली आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. त्यांना एसटी चालकाने पहेला पीएचसी मध्ये नेले. तिथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले.

सायंकाळी सुमारे ५ च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. या अपघाताला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या न्याय मागण्या त्वरित पूर्ण केल्या असत्या तर हा अपघात झाला नसता आणि कमलताई गोंधळे यांचा मृत्यू झाला नसता. कमलताईच्या निधनामुळे सर्व अंगणवाडी कर्मचाºयांमध्ये आणि गावकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. करीता लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांचा आणि संपाचा समाधान करावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी आणि गावकरी करीत आहेत असेही कॉ. हिवराज उके यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. परत एकदा या ठिकाणी त्यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. लाल सलाम करण्यात आला आणि सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *