जुनी पेन्शनसाठी आॅर्डनन्स फॅक्टरी कर्मºयांचे उपोषण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रक्षा विभागाची जुनी पेन्शन पूर्ववत सुरू व्हावी यासाठी न्यु एक्सप्लोसिव फैक्टरी वर्कर्स यूनियन (इंटक) भंडारा व रेड युनियनतर्फे भंडारा आयुध निर्माणी च्या मुख्य गेटसमोर ८ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान चार दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जुनी पेन्शन पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटना बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. देशातील प्रमुख कर्मचारी संघटना, रेल्वे आणि रक्षा विभागाने या संपाला संमती दिली आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी रेल्वेच्या ११ लाख कर्मचाºयांपैकी ९६ टक्के कर्मचारी बेमुदत संपावरजाण्याच्या तैयारीत आहेत. याशिवाय रक्षा विभागाच्या (सिव्हिल) ४ लाख कर्मचाºयांपैकी ९७ टक्के कर्मचारी संपाच्या बाजूने आहेत. जुन्या पेन्शनसाठी गठित नॅशनल जॉइंट कौन्सिल आॅफ अ‍ॅक्शन (ठखउअ) च्या समितीचे वरिष्ठ सदस्य आणि आय. एन. डी. डब्ल.ु एफ. फेडरेशनचे महासचिव श्रीनिवासन म्हणाले की, संपाची नोटीस आणि अनिश्चित काळासाठी संपाबाबत अंतिम निर्णय या महिन्यात घेतला जाईल. मार्चपासून देशभरातील कर्मचारी सरकारी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये बेमुदत संप सुरू करू शकतात. हा संप झाल्यास रेल्वे ठप्प होईल आणि रक्षा क्षेत्रातील उद्योगधंदे ठप्प होतील. केवळ केंद्रातच नाही तर राज्यांमध्येही सरकारी कामे ठप्प होतील.

याचा केंद्र व राज्य शासनाच्या विभागांना फटका बसणार आहे. त्याचाच एक भाग म्हणुन संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत भंडारा आॅर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचाºयांनी ८ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान इंटक व रेड युनियन भंडारा यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसाचे उपोषण केले. उपोषणकर्त्यांमध्ये इंटक युनियनचे महासचिव अण्णा मोटघरे, कार्य. अध्यक्ष कैलाश टेकाम व रेड युनियनचे सरचिटणीस कालिदास धकाते , कार्याध्यक्ष भरत बारई यांचा समावेश आहे. आज दि.११ जानेवारी रोजी सायंकाळी उपोषणाची सांगता झाली. यावेळी संघटनेतर्फे ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देण्यात आल्या. इंटक चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रशिल नागदेवे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘सरकार तर्फे नवीन पेन्शन योजनेतील कोणतीही दुरुस्ती आम्हाला मान्य नसल्याचे सांगीतले. या उपोषणात संघटनेचे संघरक्षित गजभिये, कुंदन चौरे, कुलदीप खोब्रागडे, एकनाथ कुंजेवार, नाना जेठे , एस. पी. खोब्रागडे, आशिष चौधरी, विकास बावनकुळे, उमाकांत तिवारी, अमोल दोडके, अतुल चौधरी, विजय वलथरे, अनिल पात्रे, बबन बनकर, कैलास जगताप, गजेंद्रसिंग कुरवेती, अतुल पाटील, तुषार चौधरी, पवन वट्टी, प्रमोद सातदेवे, नीलेश दुधे, नितीन कोटगले, अमोल हाडे, अमित गोंडाणे, मनीष शिवणकर, प्रशांत कोचे, दिनेश पटले, राहुल गिरीपुंजे, टेकराम बावनकर, मिलिंद चहांदे, सुरेश मोरया यांनी सहभाग नोंदविला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *