बारावीच्या प्रात्यक्षीक परीक्षांचे साहित्य स्वीकारण्यास शिक्षण संस्थांचा नकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पुढच्या काही दिवसात बार- ावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य घेण्यास नकार देत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था चालकांची बैठक आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ ला शासकीय विश्राम गृह भंडारा येथे पार पडली यात आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झाली नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने अनेक शाळा डबघाईस येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

करीता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने यावर्षीच्या शालांत परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे व शाळांच्या, महाविद्यालयांच्या इमारती व कर्मचारी परीक्षांसाठी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने अजुनही या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कोणतीही हालचाल केलेली नाही.त्यामुळे बहिष्कार आंदोलन तीव्र करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला असूनराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम, अखिल महाराष्ट्र माध्यमीक व उच्च माध्यमीक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीला भंडारा जिल्हा संस्था संचालक संघटना अध्यक्ष आल्हाद भांडारकर, कार्यवाह हेमंत बांडेबुचे, सचिन तोडकर, गौतम हुमने, अभिजित वंजारी, अमोल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने संस्था संचालक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *