जुगार अड्डयावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- येथील शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हसारा टोली येथे शनिवारी ता. ३ फेब्रुवारी ला नंदू मिताराम बर्वेकर यांच्या घरी ताश पत्तीवर पैशाची बाजी लावून हारजितीचा जुगार सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाºयांना मिळाली असता आय पी एस रस्मिता राव यांच्यासह त्यांच्या पथकानी बर्वेकर यांच्या घरी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शनिवारी दुपारी ५ वाजता च्या दरम्यान धाड टाकून सात जणांना अटक करण्यात आली असून आरोपीच्या अंगझडतीत ३१ हजार ९२० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. नंदू मिताराम बर्वेकर (५०) बलराम हरिदास पिलगर (२५) सचिन रामदास आगासे वय (३२) प्रशांत गुलाब मेश्राम (३२) युवराज जयपाल सहारे (४०) मनोज श्यामदास बरेकर (४९) चतुरश्याम नंदराम राणे (४८) सर्व आरोपी राहणार हसारा टोली अशे जुगाºयांची नावे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात तुमसर पोलिसांत विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *