शिवजयंती उत्साहात साजरी; महावितरणचे महाराजांना अभिवादन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महावितरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या कार्यालयाच्या प्रांगणात शिवरायांच्या प्रतिमेला प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह अधीक्षक अभियंता हरीश गाजबे, सहमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सहायक महाव्यवस्थापक ( मानव संसाधन ) प्रदीप सातपुते, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे यांनी देखिल महा- राजांना अभिवादन केले. यावेळी महावितरण आणि महानिर्मितीचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या आदर्शांवरून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *