अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य विद्यृत वितरण विभागाच्या वतीने नुकतेच दिनांक ३१/०१/२०२४ ला CE/B&R/ Recovery
/03411 या पत्रा व्दारे विद्यृत वितरण विभागाच्या वतीने बिल संदर्भात थकबाकीदाराना पुर्ण बिल भरणा करण्याच्या संदर्भात जुलमी निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे भंडारा जिल्हयातील अनेक विद्यृत ग्राहकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागणार आहे.विद्यृत वितरणच्या या निर्णयामुळे ग्राहक व विद्यृत कर्मचारी यांच्या मध्ये नाहक वाद होवून ग्राहक व कर्मचारी यांच्यात हाणामारीची देखील शक्यता नाकारता येत नाही.या सर्दभात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिनांक १४/०२/२०२४ ला निवेदन देण्यात आलेत. वितरण विभागाच्या वतीने घेतलेला निर्णय हा आठ दिवसाच्या आत मध्ये परत घेतला नाही तर विद्यृत वितरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूढे अन्न त्याग आदोलनावर बसणार आहेत. याची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी अशा ईशारा देण्यात आले आहेत.

निवेदनात थकबाकी दारांना बिल भरण्यात मुदत देण्यात यावी, प्रि पेड मिटर संबंधी पायाभूत सुविधा दिल्या शिवाय लावू नये ,प्रि पेड मिटर लावण्या संबंधी सक्ती करुन नये तो एच्छीक करावे,शेतकºयांना २४ तास विज पूरवठा करण्यात यावा या मागण्यावर गांर्भियाने विचार करण्यात असे निवेदनात म्हटंले आहेत. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष किरण अतकरी , मधुकर चौधरी शहर अध्यक्ष,यशवंत भोपे जिल्हा उपाध्यक्ष, सुखराम अतकरी सहकार सेल जिल्हा अध्यक्ष,राजा खॉन सचिव, श्याम कळंबे मोहाडी तालुका अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष शाहिना खान, रुपाली साखरकर, श्रुती बावनकुळे, ईश्वर कळंबे भंडारा तालुका अध्यक्ष, राकेश श्यामकुवर जिल्हा मिडिया प्रमुख, नितीन तलमले उपाध्यक्ष विधानसभा, गणेश ठवकर किसान अध्यक्ष मोहाडी तालुका, प्रफुल्ल मेश्राम युवा अध्यक्ष लाखनी,जितेंद्र श्यामकुवर लाखनी तालुका युवक उपाध्यक्ष, भाऊदास धुर्वे,सत्वधिर दहीवले, रुपचंद लिंगायत, विलास झोडापे, विजय नवखरे लाखनी ओबीसी अध्यक्ष , यशवंत भोयर,बुध्दे, गजभिये शहापूर, विजय बारई, आशीष पडोळे,राजु येरपुडे, अजय सेलोकर व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *