जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहे. यासाठी ९ फेब्रुवारी मृद व जलसंधारण विभागाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. तीन पाळ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसºया दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाºयानेच प्रश्नपत्र्-ि ाका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. ही परीक्षा संगणक आधारित असून प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ते सर्वांना बंधनकराक राहिल. याची सर्व नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच सत्रात प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाºयाने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केली आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे. काही दिवसांआधीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, अद्यापही या परीक्षेतील गोंधळ सुटलेला नाही. तलाठी भरतीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिले जात आहेत. मात्र, शासनाकडून यावर अद्यापही यावर कठोर कारवाई केली गेली नाही. त्यानंतर आता मृदू व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *