आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आॅनलाईन उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागा मार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राचे’ आॅनलाईन’ उद्घाटन आज बुधवार रोजी पार पडले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता वनावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यावेळी उपस्थित होते. दृक श्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये भंडारा जिल्हयातील सनी स्प्रींग डेल ज्युनिअर कॉलेजमध्ये आॅनलाईन उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडाराचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी भाऊराव निबांर्ते, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, गटनिदेशक विजय कावळे, सनी स्प्रींगडेल, ज्यु. कॉलेजचे प्राचार्या समृध्दी गंगाखेडकर, निखील बाभरे तसेच शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थिती होते. “राज्यातील १ हजार महाविद्यालयात ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ स्थापन केले जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, युवापिढीने शिक्षणा बरोबरच कौशल्य प्राप्त करणे, ही काळाची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, सध्या १०० महाविद्याल यांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ असे नाव देण्यात येत असून, आणखी १ हजार महाविद्यालयां मध्ये अशी केंद्रे सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. भारत हा जगातील तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. देशात प्रथम स्थानी येऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि आपली अर्थ व्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासा वर शासनाने भर दिलेला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १ हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती .त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थ संकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्या बद्दल मंत्री मंगल प्रभात लोढायांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *