कारभाºयांचा झाला विकास, शहर मात्र भकास!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया हे शहर जिल्ह्याचे केंद्र आहे. या शहरात रेल्वे जंक्शन, एसटीचे आगार, अग्निशामक पथक, अ श्रेणीची नगर पालिका याशिवाय जिल्ह्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. असे असतानाही गोंदिया शहर एक नव्हे तर अनेक समस्यांचे माहेर घर होत चालले आहे. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. केरकचºयाचा प्रश्न आजही सतावत आहे. या प्रश्नांना वाचा फोडणारे कारभारी मात्र सुस्त आहे. त्यामुळे कारभाºयाचा झाला विकास, शहर मात्र भकास असे म्हणण्याची वेळ शहरवासियांपूढे आली आहे. गोंदिया नगर पालिका सर्वात जुनी नगर पालिका आहे. या नगर पालिकेचा कारभार अनेक मोठ्या नेत्यांनी सांभाळलेला आहे. मात्र अद्यापही या शहराचा हवा तेवढा विकास झाला नाही. विकासाची कामेही कारभाºयाच्या मनमजीर्नेच होत आहे. त्यामुळे शहराचा विकास सर्वसामान्यांच्या जिव्हारी आला आहे. मोठे उड्डाणपुल बांधण्यात आले आहे. मात्र, त्या उडाणपुलाच्या निर्मितीचा आराखडाही कारभाºयाने आपल्या सोयीनुसार तयार केला आहे. त्यामुळे ते उडाणपुल वर्दळीसाठी अडचणीचे ठरू लागले आहे. भुमिगत गटार योजनेला पाच वर्षापुर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पूर्णत्वास आली नाही.

गटार योजनेच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली आहे. ही योजना जरी भविष्यात शहरवासियांसाठी गटार पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी असली तरी अनेक समस्यांना निर्माण करणारी ठरणार आहे. मागील पाच वर्षापासून घनकचराव्यवस्थापनाचा सोक्षमोक्ष अद्याप पर्यंत लावण्यात आले नाही. कचºयाचे ढिगारे शहरातील प्रत्येक रस्त्यांवर पहावयास मिळत आहे. नाल्यांची सफाई केली जाते. मात्र निघालेल्या कचºयाची विल्हेवाट लावली जात नाही. नगर पालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभाग नावापुरताच ठरू लागला आहे. नगर पालिकेच्या अनेक शाळा अखेरच्या घटका मेउजत आहे. तर नगर पालिकेचे सुतिकागृह बंद झाले आहेत. एवढेच नव्हे तर प्रभाग आरोग्य केंद्र फलकापुरतेच पहावयास मिळत आहे. एकंदरीत गोंदिया शहर समस्यांचे माहेरघर होत चालले आहे. वाढत्या समस्या,प्रलंबित प्रश्नामुळे विकासाची कल्पना तर दुरच शहराचा भकासपणा चर्चेत आला आहे. यामुळे ‘कारभाºयांचा झाला विकास, शहर मात्र भकासह्ण अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून उमटू लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *