घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आंतरराज्यीय घरफोड्या टोळीवर अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने १९ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून कार्यरत असलेल्या या टोळीने गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

देवरी येथील सुरभी चौक रहिवासी फिर्यादी योगेश मुनेश्वर यांच्यासह परिस- रातील अनेकांकडील सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, लॅपटॉप व रोख रक्कम, असा एकूण १.०१ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार २६ आॅक्टोबर रोजी देवरी पोलिस ठाण्याला केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून मध्यप्रदेशातील बालाघाट व सिवनी जिल्ह्यांत धाड टाकली. यात मकबुल शाह (३५, रा. चांगोटोला, ता. लामटा, जि. बालाघाट, मध्यप्रदेश), मुस्तफा ऊर्फ गुड्डू शाह (४७,रा. मालनवाडा, ता. केवलारी, जि. सिवनी, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शन करण्यात आली. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार रियाज शेख, पोलिस हवालदार तुलसीदास लुटेयांनी केली. तपासादरम्यान आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, चांदीची भांडी, असा एकूण ४ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस ठाणे देवरीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *