
लाखनी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा नुकत्याच नागपूर विद्यापीठ मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये समर्थ महाविद्यालय लाखनी ची विद्यार्थिनी कु. स्वाती उईके हिने लांब उडी क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय स्थान पटकावून रोप्य पदक प्राप्त केले. विद्यापीठ मैदानी स्पर्धेमध्ये लांब उडीमध्ये सातत्याने चार वषार्पासून स्वाती उईके पदक प्राप्त करीत आहे.
मागील वर्षी महाराष्ट्र स्तरावर आयोजित क्रीडा महोत्सवामध्ये स्वातीने सुवर्णपदक प्राप्त करून समर्थ महाविद्यालयाचा लौकिक वाढविलेला होता. आता डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या क्रीडा महोत्सवासाठी नागपूर विद्यापीठाने मैदानी स्पर्धा संघामध्ये स्वातीची निवड केलेली असून हे क्रीडा महोत्सव नांदेड येथे आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कर्मचारी वृंद, प्राध्यापक गण तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. धनंजय गिरीपुंजे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी स्वातीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.