
भंडारा पत्रिका/यशवंत थोटे मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन हद्दीतील लोकमाता वैनगंगा नदीच्या पात्रातील विदर्भाची काशी नृसिंह देवाची यात्रा प्रारंभ झाली असून यात्रेकरू व भाविकांची संख्यादिवसागणिक वाढत आहे. मोहाडीपासून २१ किमी अंतरावर असलेल्या माडगी आणि देव्हाडा या दोन गावांच्यामधून लोकमाता वैनगंगा बारमाही वाहत असते. या पात्रात एक सुंदर टेकडी आहे. टेकडीवर नृसिंह देवाचे स्थान असून बाजूलाच गालचिरीचे स्थान आहे. डिसेंबर महिन्यात नृसिंह देवाच्या यात्रेला प्रारंभ होतो.यात्रा १५ दिवस चांगली असते. येथे सुंदर मंदिर आहे.
देव्हाडा बु.येथील गोसावी कुटूंबाकडे मंदिराची व्यवस्था होती. रोज सायंकाळी येथे दिवे लावले जातात. वैनगंगेला कितीही पूर असला तरी नावेवर बसून मंदिरात दिवा लावणीसाठी भाविक तिथे जातात. अलिकडे देवी-देवांना चांगले दिवस आल्यामुळे, दु:ख परिहारासाठी व पापक्षालनासाठी भक्तांची गर्दी सारखी वाढत चालली आहे. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र, खळाळून वाहणारा प्रवाह आणि जवळच उभा असलेला इंग्रजकालीन रेल्वे पुल, पुज्य अण्णाजी महाराजांची तपस्थळी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहली येथे नेहमी येत असतात. यात्रा काळातपण सहली येत राहतात. जनपद सभेच्या स्थापनेपूवीर्पासून नृसिंह यात्रेसाठी अलिकडेपर्यंत शाळांना एका दिवसाची सुटी असायची. नवसाला पावणारा देव म्हणून काळात नवस फेडणाºयांची प्रचंड गर्दी असते. यात्रेला येणाºया भंडारा जिल्ह्यासोबतच मध्यप्रदेश व छत्तीसगढ सिमेवरील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी देत असतात. हे क्षेत्र करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी पोलिसांशिवाय शांततेत आणि विना तक्रार चालणारा यात्रा आहे. एकदा येथे येऊन गेलेला यात्रेकरू परत परत येतो हा अनुभव आहे. यात्रा सध्या भरीवर सुरू आहे. एक आख्यायिका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू नृसिंह अवतारात खांबातून प्रकट झाले.
भगवान नृसिहाने हिरण्यकश्यपाच्या पोटात आपली तीक्ष्ण नखे खुपसून मांडीवर मांडून त्याचा वध केला. हे नृसिहाचे रूप उग्र स्वरूप एका मुतीर्तून प्रतिबिंबीत होते. दुसºया मुर्तीतून भाविकांच्या हाकेला धावणारा भोळा नृसिंह दृष्टीस पडतो. मुख्य मंदिराच्या दरवाजातून सरळ आत गेल्यास तळघरासारखा भास होतो. तेथे हनुमंताची मुर्ती आहे. त्याच कोपºयात हवनकुंड आहे. काही पायºया चढल्यास दरवाजावर उभे होताच भगवान कृष्णाची मुर्ती दृष्टीस पडते. मुर्तीजवळील खिडकीतून भगवंताच्या मुर्तीवर सकाळचा पहिला सुर्यप्रकाश पडून मुर्ती विलोभनीय असते. श्री गुरुदेव परमपूज्य ब्रम्हलीन श्री श्री १००८ राजयोगी श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज पुण्यतिथी महोत्सव, श्री क्षेत्र नृसिंह मंदिर टेकडी दंडकारण्य वैनगंगा आश्रम माडगी/देव्हाडा बु.पर्यटन क्षेत्र क वर्ग वर्ष ४१ वे गुरुवार दि.१८ ते २२ डिसेंबर २०२५ ला संस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष निलकंठ पुडके हिवरा, उपाध्यक्ष नत्थू भोंगाडे तुमसर,संचालक रंजन रविशंकर ढोमणे मोहाडी, उपसंचालक छाया नशीने मुंढरी बु.,सचिव मदन शेंडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम सेलोकर, सदस्य यशवंत आसटकर, देवराव बोंदरे, हेमराज आदमने, दिगांबर ईलमे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.१८ डिसेंबर २०२५ ला सकाळी ९ वाजता प.पू.श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज भगवान नृसिंह मुर्ती पुजन. सकाळी १० वाजता जिल्हा सर्वस्तरीय भव्य कलाकार सांस्कृतीक शिबीर मेळाव्याचे उद्घघाटन रंजीता राजू कारेमोरे यांच्या हस्ते तर शुभांगी मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. विशेष अतिथी माजी नगरसेवक परीनीती फुके, दिपीका गौपाले, कविता बनकर, ज्योती मालाधरे, यमु बोंदरे, ज्योती वाघाये हे राहतील. सायंकाळी ६ वाजता सामुदाईक प्रार्थना संबोधन ह.भ.प. अहिल्या गोखले एकोडी. सहभागी सर्व कलाकारांना प्रत्येकी शंभर रुपये देण्याºयांना प्रमाणपत्र देण्यात येईल. शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ ला सकाळी १० वाजता जिल्हाव्यापी भव्य कलाकार सांस्कृतिक शिबिर मेळावा.
सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना संबोधन हभप सुशील बुरडे जिल्हा सेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ. शनिवार दि.२० डिसेंबर २०२५ ला पहाटे ५ वाजता ग्राम स्वच्छता माडगी आणि देव्हाडा बु.ग्रामस्थांकडून सकाळी ६ वाजता सामूदायिक ध्यान मनोहर निंबार्ते महाराज. सकाळी ९ वाजता अभिषेक पूजा प.पू.हनुमानदासजी अण्णाजी महाराज भगवान नृसिंह, पं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज. दामोधर आसटकर नागपूर, डॉ.रत्नाकर बांडेबुचे भंडारा, राज हेमचंद्र कटकवार नागपूर, ज्योती कावळे, वंदना साठवणे करडी, रंजन ढोमणे व सर्व सेवकगणाच्या उपस्थितीत. सकाळी ११ वाजता श्री राम चरित्र मानस अखंड पारायण.
सकाळी ११.३० वाजता अखंड नामस्मरण गुरुदेव महिला भजन मंडळ माडगी, बाल नरसिंग महिला भजन मंडळ, माडगी, जय दुर्गा महिला भजन मंडळ नरसिंग टोला, गुरुदेव महिला भजन मंडळ, देवाडा बु., आदिवासी महिला भजन मंडळ नरसिंग टोला, मेहर बाबा महिला भजन मंडळ नरसिंग टोला, मेहर कृपा महिला भजन मंडळ नरसिंग टोला, गुरूदेव महिला भजन मंडळ नरसिंग टोला. संध्याकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना संबोधन ह.भ.प.रतनजी गडरिये महाराज दहेगाव. संध्याकाळी ६.३० वाजता ग्रामगीता वाचन देव दर्शनह.भ.प.चंद्रकुमार आसटकर महाराज गांगला. रात्री ९ वाजता भजन संध्याकाळ सरगम ग्रुप भंडारा प्रमुख गणेश आतिलकर, रेखा पटले भंडारा, नरसिंग भजन मंडळ माडगी प्रमुख बाळकृष्ण धुमनखेडे.
रविवार दि.२१ डिसेंबर २०२५ ला पहाटे ५ वाजता ग्रामस्वच्छता देव्हाडा बु.ग्रामस्थांकडून सकाळी ६ वाजता समुदाय लक्ष केंद्रित चिंतन ह.भ.प.चंद्रकुमार आसटकर महाराज. सकाळी ८ वाजता रामधुन व पालखी सहल देव्हाडा बु.नृसिंह टोला येथील टेकडी प्रमुख ह.भ.प.पांडुरंग शेंडे महाराज अडेगाव ह.भ.प.घनश्याम पडारे महाराज रोहा, लेझिमपथक कै.पुष्पलताई तोडकर शाळेचे नरसिंग मुख्याध्यापक मेश्राम गुरुजी व शिक्षक व ग्रामस्थ. सकाळी ११ वाजता यज्ञ आणि पूणार्हुती. प्रमुख छाया नशीन मुंढरी बु.,अंजनीकर परिवार गोंदिया, अनुराधा उटाणे कान्हळगाव,नामदेव साठवणे चंद्रपूर, लोकेश कावळे करडी व भाविक.
दुपारी ३ वाजता पालखीचे आगमन व स्वागत गुरुदेव सेवा मंडळ कान्हळगाव ह.भ.प.जयसिंग कस्तुरे महाराज. सायंकाळी ५ वाजता सामुदायिक प्रार्थना सहकार्य साईराम भजन मंडळ परसवाडा व संच अमोल खवास, डॉ.सुनील कहाळकर, धनंजय खवास, कृष्णा लाडेकर, संदीप भगत, सखाराम खवास, मनोज मोहतुरे. सायंकाळी ५.३० वाजता श्रद्धांजलीचे चिंतन व प्रवचन ह.भ.प.सुशीलदादा बुरडे जिल्हा सेवा अधिकारी गुरुदेव सेवा मंडळ संध्याकाळी ७.२० वाजता मूक श्रद्धांजली. रात्री ९ वाजता कीर्तन प्रवचन ह.भ.प. निरज निवृत्ती मंदारी महाराज कोरंबी. सोमवार दि.२२ डिसेंबर २०२५ ला पहाटे ५ वाजता ग्रामस्वच्छता माडगी व देवहाडा बु.ग्रामस्थांकडून सकाळी ६ वाजता ह.भ.प.नारायण धकाते मोहाडी. सकाळी ८ वाजता रामधुन व पालखी सहल माडगी ते नृसिंह टेकडी प्रमुख पांडुरंग शेंडे महाराज, बिसन सपाटे महाराज, हनुमत पुडके दहेगाव.
लेझिमपथक जि.प.शाळा माडगीचे शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ,गौरीशंकर पंचबुधे, श्रीधर हिंगे, लाला नावरे, देवराम बोंदरे, शंकर मेश्राम, फुकटु हिंगे, परमेश्वर वानखेडे, कालीदार वनवे, अरुण कांबळे, ज्ञानेश्वर हिंगे व ग्रामवासी माडगी. सकाळी ९ वाजता कीर्तन हभप निरज निवृत्ती मंडारी महाराज कोरंबी. सकाळी ११ वाजता गोपालकाला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सुनिल लांजुळकर महाराज जिल्हा अकोला. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत महाप्रसाद हिंदुत्व समर्पण ग्रुप मोहाडी, छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर, वैनगंगा खाजगी आयटीआय देव्हाडा बुज, एकलव्य ढिवर समाज संघटना माडगी, देव्हाडा, चारगाव, ढोरवाडा, बाम्हणी, देव्हाडा खुर्द, प्राणहंस मेहर, श्रीराम येळणे कुशारी, सूतीष्ण चोपकर. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना व प्रबोधन मदन शेंडे मध्यवर्ती प्रतिनिधी गुरुकुंज परसवाडा. सायंकाळी ७ वाजता समारोपीय आभार कार्याध्यक्ष हिरालाल लांजेवार हे करतील. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही हा कार्यक्रम पूजनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज यांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे, श्री १००८ योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज, दत्त अवतार श्री नारायण महाराज, केडगाव बेट, पुणे, भगवान नृसिंह यांच्या उपस्थितीत, माता वांगंगाच्या मांडीवर,पवित्र आणि सिद्ध टेकडीवर. म्हणून, सर्व धर्माभिमानी भक्त आणि उपासकांना या उत्सवाला उपस्थित राहून त्याचा लाभ घेण्याची विनंती संचालक रंजन रवीशंकर ढोमणे यांनी दैनिक भंडारा पत्रिकाच्या माध्यमातून केली आहे.