
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षा पास करूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तथा विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर केला आहे. महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज सिहोरा येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी प्रत्युष रविकिरण वासनिक, रागिनी विजय नागदिवे, विनल सुरेश, गणेश मोतीराम देव्हारे, आकांक्षा भास्कर माने या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन द्वारा घेण्यात येणाºया आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) परीक्षा वर्ष २१-२२मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत असताना उत्तीर्ण केली त्यानुसार त्यांना टऌ भाजपाचे गजानन निनावे यांचा आरोप 202223004291097 ही आयडी प्राप्त करून वर्ष २३२४ मध्ये प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली. वर्ष २४-२५ मध्ये महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज सिहोरा येथे विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व ठरढ पोर्टलमध्ये नूतनीकरण अर्ज सादर केला सोबतच टऌऊइळ पोर्टलमध्ये शिक्षकांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती शिष्यवृत्ती करिता अर्ज सादर केला.
परंतु ठटटर विभागाने सदर विद्यार्थ्यांना टऌऊइळ ची १७०४ रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली व ठटटर गुणवत्ता शिष्यवृत्ती १२ हजार रुपये नाकारण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे. शिक्षकांना माहीत होते की आपल्या विद्यालयात ठटटर परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत तरी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती चे फार्म भरून घेतले त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये फार असंतोष निर्माण झालेला आहे यावर तोडगा काढण्याकरिता विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे, सचिव मोतीलाल ठवकर, बाला तुरकर, राजू मेळेवार, रविकिरण वासनिक यांनी संबंधित विद्यालयाच्या शिक्षकांची संपर्क साधला व विद्यार्थ्यांच्या संदर्भात चर्चा केली असता शिक्षकांकडून त्यांना उडवा उडवीचे उत्तर टऌऊइळ देण्यात आले त्यांचे समाधान करण्यात आले नाही व विद्यार्थ्यावर झालेल्या अन्याय संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे यावर योग्य प्रकारे न्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे
विद्यार्थी जर शासनाच्या नियमानुसार आपली गुणवत्ता सिद्ध करून शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत व त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर विद्यार्थी पालक संघ खपवून घेणार नाही अन्यायाविद्याविरुद्ध आंदोलन करण्याची सुद्धा तयारी विद्यार्थी पालक संघाने दर्शविली आहे या विषयावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव व विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे, मोतीलाल ठवकर यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्याची मागणी केलेली आहे व ज्या शिक्षकाच्या मार्फत विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली आहे.