अटक वॉरंट, नाराजी नाट्यादरम्यान मंत्री कोकाटे रुग्णालयात दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून, त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सदनिका घोटाळा प्रकरणातील दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्यानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटेंविरुद्ध अटक वॉरंटासाठी अर्ज दाखल केला होता आणि आज न्यायालयाने तो मान्य केला. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माणिकराव कोकाटें यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तातडीने धाव घेतली असून, तिथे शिक्षेवर स्थगिती मिळविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल असून, त्यांच्या प्रकृतीची माहिती न्यायालयाला दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हायकोटार्चा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कोणतीही कारवाई होणार नाही, असा तातडीचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटें यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आवश्यक होऊ शकतो.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *