जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रम संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भाषीक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक देखील या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे अल्पसंख्यांक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे पुर्ण सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा झाला, यावेळेस ते बोलत होते. दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याक विकास विभागाचे परिपत्रक १० डिसेंबर २०२५ अन्वये जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म व परंपरा जतन व संवर्धन करण्याचा अधिकार असून, या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगड्डे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.दातीर आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुμती मो.साजिद, संचालक, मदरसा अरबिया तालिमुल इस्लाम, भंडारा, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (जिल्हा अध्यक्ष भंडारा), शांतता समिति सदस्य तसेच किशोर नामेदव बौध्द, जिल्हा अध्यक्ष, भारतीय पंजीकृत बौध्द महासभा भंडारा जिल्हा तथा सदस्य महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया मोबाईल क्रमांक आणि जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख, भंडारा मोहम्मद आरिफ शेख उपस्थित होते. यावेळी मुफती मोहम्मद साजिद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर किशोर नामदेव यांनी देखील अल्पसंख्यांकांसाठी शासन करत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यासाठी शासनाची भूमिका प्रास्ताविकेमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगड्डे यांनी व्यक्त केली तर मोहम्मद आरिफ शेख जिल्हा अल्पसंख्यांक प्रमुख भंडारा यांनी देखील या दिवसाचे महत्त्व आपल्या भाषेमध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, महिला बालविकास विभागाचे अधिकारी श्री.बांदोडकर यासह अन्य अधिका- री कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्रीमती बोरीगिटटे यांनी शासकीय योजनांचा लाभ अल्पसंख्याक समुदायातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिटटे यांनी केले.सुत्रसंचलन श्रीमती भोंगाडे यांनी तर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दातीर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *