
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ अंतर्गत सुरू असलेल्या भंडारा बायपास रस्ते प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकल्पात उपठेकेदार CCR कन्स्ट्रक्शन हैदराबाद कडून सुमारे ६ कोटी ३८ लाखांहून अधिक रकमेच्या साहित्य व कामाचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदार हर्षवर्धन गायकवाड रा. भंडारा (वय ३०), प्रकल्प व्यवस्थापक, श्री स्वामी समर्थइंजिनिअर्स लिमिटेड, पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.श्री स्वामी समर्थ इंजिनिअर्स लिमिटेड ही कंपनी ठऌअक (नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया) अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची अधिकृत कंत्राटदार असून सदर बायपास रस्त्याच्या कामासाठी उउफ कन्स्ट्रक्शन या कंपनीस उपठेका देण्यात आला होता. फिर्यादीनुसार, प्रकल्पासाठी लागणारे सिमेंट, लोखंडी सळया,वायर, काँक्रीट साहित्य, शेड मटेरियल, लागणारी मशिनरी, शटर प्लेट, लाईट मटेरियल, इलेक्ट्रिकल साहित्य आदी कोट्यवधी रुपयांचे साहित्य कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आले होते.
मात्र दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत CCR कन्स्ट्रक्शन कडून सदर साहित्याचा प्रत्यक्ष कामात योग्य वापर न करता गैरवापर करण्यात आला तसेच अनेक साहित्य परस्पर अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामाच्या तुलनेत जास्तीची बिले सादर करून रक्कम उचलण्यात आली. एकूण कामाची किंमत, वापरलेले सा-ि हत्य व प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. या गैरव्यवहारात अंदाजे ६,३८,२९,८३३ (सहा कोटी अडतीस लाख एकोणतीस हजार आठशे तेहेतीस रुपये) इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीनंतर कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहार, साहित्य नोंदी, बिलांची छाननी तसेच प्रत्यक्ष कामाची स्थळ पाहणी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अपहृत रक्कम व साहित्य वसूल करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार कंपनीकडून करण्यात आली आहे.