लाखांदूरात एकाच दिवशी दोन अपघात

मद्यधुंद ट्रॅक्टर चालकामुळे भीषण अपघात, ४ वर्षीय बालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर शहरात आज सकाळी दिनांक शुक्रवार २६ डिसेंबर रोजी ७:३० वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाºया ट्रॅक्टरने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय बालकासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णापायात मृत्यू झाला .या अपघातात दक्ष अवसरे (वय ४ वर्षे) असे मृतकाचे नाव असून निलेश अवसरे (वय अंदाजे २८ वर्षे), दोघेही रा. लाखांदूर हा गंभीर जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, निलेश अवसरे हा ट्रॅक्टरमध्ये आपल्या सहकाºयांसोबत कामानिमित्त बाहेर जात असताना सदर ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात होता.

याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट डिव्हायडरला धडकला. अपघात इतका भीषण होता की डिव्हायडरवरील लोखंडी कठडे चिरडले गेले आणि ट्रॉली रस्त्याच्या दुसºया बाजूला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान चार वर्षीय दक्ष अवसरे याला गंभीर स्वरूपाची (इंटरनल हेड इंजुरी) झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे.तर उपचारा दरम्यान बालकाचा मृत्यू झाला.तर निलेश अवसरे यांच्यावर लाखांदूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार सदर ट्रॅक्टरचा चालक हा अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मृतक दक्ष अवसरे हा ट्रॅक्टर चालकाचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे लाखांदूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कार- वाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टायर फुटल्याने चारचाकी गाडीचा अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जवळ शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ.प्रतीक उईके यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.चालत्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला.या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके सुदैवाने बालबाल बचावले आहेत. प्राप्त माहितीनुसार,डॉ. प्रतीक उईके हे पंचायत समिती सदस्य मधुर उके यांच्या सोबत काही कामा निमित्ताने नागपुरला गेले होते.

नागपुर वरून परत येतांना डाँ. उईके यांनी पंचायत समिती सदस्य मधुर उके यांना त्यांच्या बारव्हा या गावी सोडून दिल्यानंतर सोनी या स्वगावी चारचाकी वाहनाने जात होते. माञ औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखांदुर समोर त्यांच्या एक्स.यु.व्हि. या चार चाकी वाहनाचा अचानक टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, नशिबाची साथ आणि वेळेत बचाव कायार्मुळे डॉ. उईके यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर सामसूम होती, मात्र अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. डॉ. प्रतीक उईके सु- खरूप असल्याची बातमी मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *