भंडाºयात अतिक्रमण हटाव मोहिम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषदेतर्फे आज दि.२ जानेवारी २०२६ रोजी भंडारा शहरातील खांब तलाव चौक ते खात रोड या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्यात आले. खांब तलाव चौक ते खात रोडवर नागरीकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला रस्ते व नालीवर अतिक्रमण करून आपली दुकाने थाटल्याने या मार्गाने नागरीकांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात नागरीकांच्या तक्रारी वाढल्याने अखेर आज नगर परिषद प्रशासनाने या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.

भंडारा नगर परिषदेतर्फे दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी लाऊड स्पीकर मुनादीद्वारे भंडारा शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नालीवर तसेच सार्वजनिक जागेवर ओटा, पायरी, टिनाचे शेड, रस्त्यावर साहित्य तसेच इतर दुकानाचे कच्चे-पक्के अवैध बांधकाम करून करण्यात आलेले अतिक्रमण नागरीकांनी स्वत: काढण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या मात्र व्यवसायीकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आपले अतिक्रमण जैसे थे च् ठेवले होते त्यामुळे नगरपरिषद ने आज नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून खांब तलाव चौक ते खात रोडवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या मोहिमेमध्ये रस्त्यावरील ४० पानठेला, बांबूचे कच्चे दुकाने, टीनाचे शेडवर कार्यवाही करण्यात आली.

याप्रसंगी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *