आ. डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात फळे व ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच लाखनी येथील राहते घरी सुद्धा अनेक नागरिकांनी आ. साहेबांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीर, दिव्यांग व्यक्तींना ट्रायसिकल व कर्णबधिर व्यक्तींना कर्णयंत्राचे वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी दिलासा देणारा ठरला. या कार्यक्रमास भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मधुरा मदनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासह सर्व माननीय नगरसेवक व नगरसेविका, भारतीयजनता युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, जनसेवेला प्राधान्य देत पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस साधेपणाने व समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व सेवाभावी वातावरणात पार पडले. वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *