पत्रकार समाजाचा आरसा-डॉ.संदीप पानतावणे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करतात आज जी काही क्रांती आणि जागृती निर्माण झाली आहे ती पत्रकारीतेतून निर्माण झाली आहे. त्यामुळे पत्रकार समाजाचा आरसा आहे. असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी डॉ. संदीप पानतावणे यांनी लाखनी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळ, लाखनी येथे बोलत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, मुख्याध्यापिका रंजना वंजारी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश वंजारी, उपाध्यक्ष चंदन मोटघरे, सचिव वाल्मिक लांजेवार, रवी धोतरे, अशोक मेघराजानी,अंगेश बेहलपाडे, गोपाल गिºहेपुंजे, राजू खान, शैलेश उरकुडे, अनिल शेंडे, रमेश बैस, राहुल बावनकुळे आदी उपस्थित होते. सुरवातीला दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. पुढे पानतावणे म्हणाले की, समाज घडविण्याचे काम पत्रकार करतात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असून समाजव्यवस्थेत मौलिक योगदान हे पत्रकारांचे आहे.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना पोलीस निरीक्षक बारसे म्हणाले की, वृत्तपत्रामधून आपल्याला दैनदिन घटना माहित होतात. तसेच वृत्तपत्रामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करता येते. त्यामुळे दैनदिन वृत्तपत्र वाचणे गरजेचे आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप पत्रकार संघातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंदन मोटघरे यांनी तर संचालन अस्मिता चवरे, उपस्थीतांचे आभार वाल्मिक लांजेवार यांनी मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *