मौदा येथील उड्डाणपूल आता परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम उड्डाणपूल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नागपूरझ्रभंडारा मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ह्यपरमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम उड्डाणपूलह्ण असे नामकरण करण्यात आले. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नामकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. आज रविवारी त्यांच्या उपस्थितीत मौदा येथे नामकरण सोहळा व उड्डाणपुलाचे लोकार्पण थाटात पार पडले. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, विकासासोबतच नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

भाविकांच्या श्रद्धेचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून, भविष्यातही परिसरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, मौदा नगरपंचायतचे अध्यक्ष प्रसन्न तिकडे, माजी आमदार टेकचंद सावरकर, परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमाचे अध्यक्ष रविंद्र गायधने, उपाध्यक्ष देवरामजी तुमचरे, सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदीप चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष दहेकर यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संचालकगण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमात दरवर्षी विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक व अनुयायी येथे दर्शनासाठी येत असतात. महामार्ग ओलांडताना भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वेगवान वाहतुकीमुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले होते व अनेकदा जीवितहानीच्या घटना घडत होत्या. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी केली होती. त्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आणि अत्यंत दजेर्दार व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमाकडे येणाºया भाविकांची तसेच नागपूरझ्रभंडारा मार्गावरील स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनचालकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ व वेगवान होणार आहे. विशेषत: गर्दीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे परिसरातील रस्ते सुरक्षिततेला चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *