मात्र सहा दिवसानंतर विहिरीत आढळला ‘तिचा’ मृतदेह

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिचखेडा येथील १७ वर्षीय सुचिता बागडे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला. २६ जानेवारीपासून ती बेपत्ता होती. समाज मंदिर परिसरातील एका विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चिचखेडा पुनर्वसन येथील रहिवासी सुचिता राजेंद्र बागडे ही २६ जानेवारीच्या रात्री गूढपणे घरातून निघून गेली होती. विशेष म्हणजे, घराबाहेर पडताना तिने आपल्या वडिलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला होता. मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधमोहीम राबवली, मात्र ती सापडली नाही. अखेर याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि नातेवाईक मागील सहा दिवसांपासून सुचिताचा शोध घेत होते. सोमवारी (दि. २) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना समाज मंदिर परिसरातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसला. माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवली असता, तो सुचिताचाचअसल्याचे स्पष्ट झाले. ऐन विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीचा असा अंत झाल्याने बागडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *