मुंबई-नागपूर-गोंदिया प्रवास अधिक वेगवान होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यातील दळणवळण पायाभूत सुविधांना चालना देणाºया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याच्या हालचालींमुळे विदर्भातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे नागपूर ते गोंदिया दरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी सव्वा तासाने कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विदर्भातील दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.

नागपूर ते गोंदियाचे अंतर १६२ किलोमीटर आहे. त्यासाठी रस्त्यावरील वाहतूक कमी असेल आणि रस्त्याची स्थिती चांगली असल्यास सुमारे ३ तास लागतात. पण, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गला गोंदिया जोडण्यात आल्यानंतर समृद्धी ते गोंदियाचे अंतर १२७ किलोमीटर वर येणार आहे. त्यामुळे सुमारे सव्वातासाची बचत होईल. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर भंडारा हा स्वतंत्र जिल्हा झाला आणि अखेरीस १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा वेगळा करण्यात आला. या जिल्ह्यात धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहेत. सूर्यदेव, मांदो देवी मंदिर शहरातील हे प्रसिद्ध मंदिर भगवान सूयार्ला समर्पित आहे. नागरा शिव मंदिर या मंदिराची अनोखी रचना आणि कलात्मक शैली प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.

गोंदिया शहरातील हे प्रसिद्ध मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. या मंदिराची भव्य रचना आणि नाजूक कोरीव काम पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. मंदिराच्या परिसरात भरपूर हिरवळ आहे, जी या ठिकाणाला एक शांत आणि भक्तिमय वातावरण देते. येथे येणारे भक्त प्रार्थना व ध्यान करून मानसिकशांतीचा अनुभव घेतात. गोंदिया शहरातील हा ऐतिहासिक किल्ला १६ व्या शतकात बांधला गेला होता. त्याच्या भव्य रचनेतून गोंदियाचा संपूर्ण नजारा पाहता येतो. इतिहासप्रेमींनी गोंदियाला भेट देताना हा किल्ला नक्की पाहायला हवा. गोंदिया शहराच्या जवळ असलेला हा निसर्गरम्य धबधबा गर्द झाडीने वेढलेलाआहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *