कूलर वापरताना घ्या ‘ही’ काळजी; महावितरणचे नागरिकांना आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : उन्हाचा वाढता पारा आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सध्या घराघरांमध्ये कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कूलरचा हा गारवा आपल्याला सुखद वाटत असला, तरी किरकोळ निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच खरबी रोड येथील एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा चालू कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. एका तज्ज्ञ व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत चटका लावून जाणारी आहे. हाच अनर्थ टाळण्यासाठी आणि नागरिकांचा उन्हाळा सुरक्षित व निर्धास्त जावा, यासाठी महावितरणने काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे सुरक्षेचे नियम जाहीर केले आहेत. थोडीशी सतर्कता ठेवून आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेऊ शकतो.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *