जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात शब्दांचा जागर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ‘पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाचा जिवंत वारसा आहेत. जिल्ह्यातील वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासनाचा मानस असून, येणाºया काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावी ग्रंथालय निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित ‘भंडारा ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्थानिक जिल्हा परिषद जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकाºयांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरिगिट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी भव्य ग्रंथदिंडी

उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता जकातदार विद्यालयापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. लेझीमचा निनाद, बँड पथक आणि ‘ग्रंथ आमचे गुरु’ अशा घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमला होता. नूतन कन्या विद्यालय, महिला समाज शाळा व जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध लेझीम संचलनाने भंडारावासियांची मने जिंकली.

ही दिंडी महात्मा गांधी चौकापर्यंत जाऊन पुन्हा ग्रंथप्रदर्शन स्थळीविसर्जित झाली. या सोहळ्याला डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, गजानन कोठेवार, संजय नारनवरे घनश्याम कानतोडे, इस्तारी मेंढे, विकास निमकर यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरेश आंबिलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब मुंडे यांनी मानले. जकातदार विद्यालयाचे प्रांगण सध्या विविध विषयांच्या हजारो पुस्तकांनी सजले असून, पुस्तक खरेदीसाठी भंडाºयातील वाचकांनी गर्दी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *