
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात रेती वाहतुकीचा प्रश्न आता केवळ अवैध उत्खननापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारा बनला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकाही रेतीघाटाचा अधिकृत लिलाव न झालेला असताना देखील, भंडारा जिल्ह्यासह गोंदिया जिल्ह्यातील नदीपात्रातून शेकडो ट्रकद्वारे रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, ही वाहतूक कोणाच्या आशीर्वादानेसुरू आहे, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.