
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्व- ाकांक्षी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात द्वितीय क्रमांकावर झेप घेत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत नागपूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. या गौरवशाली कामगिरीची दखल घेत ‘आॅल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन’ (अकफएअ) तर्फे नागपुरात आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सवात’ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांसह विविध संस्थांचा विशेष पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ (अकऊ) द्वारे हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेष सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (टठफए), ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ ( ), महावितरण आणि जन समर्थ या संस्थांचे फएउ वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महावितरणचे संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पंकज तगडपल्लीवार आणि कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांना ‘एआयआरईए रिन्युएबल एनर्जी ज्वेल्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ उद्योगपती गिरधारी मंत्री आणि महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच एमएनआरईचे संचालक आदित्य प्रताप सिंह आणि आरईसीचे विभाग प्रमुख संजय त्रिपाठी यांनीही आपल्या संस्थांच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे देशभरात घरांच्या छतांवर सौर प्रकल्प उभारणीला मोठी गती मिळाली आहे. सौर रूफटॉपच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध होत असून महाराष्ट्र यात अग्रेसर आहे. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांनीही राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवून आपली चमक दाखवली आहे. संपूर्ण देशात दररोज ६,५०० हून अधिक रूफटॉप सौर प्रकल्पांची स्थापना होत असल्याची माहिती आदित्य प्रताप सिंह यांनी यावेळी दिली. तर, महावितरणचे संचालक सचिन तालेवार यांनी ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि स्वयंचलित (आॅटोमेटेड) केल्यामुळे अनुदानाचे वितरण अत्यंत वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे नमूद केले.
या महोत्सवाचे औचित्य साधून सौर ऊर्जा क्षेत्रातील नोंदणीकृत विक्रेत्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण जगप्रसिद्ध ‘सोलर इज माय पॅशन’ या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले. तसेच ‘अॅडवांटेज विदर्भ’मधील ‘सोलर पॅव्हेलियन’मध्ये महावितरण आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचा संयुक्त स्टॉल उभारून विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले. तांत्रिक सुलभता, वाढलेली जनजागृती आणि अधिकाºयांची कार्यतत्परता यामुळेच महाराष्ट्र आज घरगुती सौर ऊर्जा निर्मितीत आघाडीवर पोहोचला असून, येणाºया काळात राज्य देशात अव्वल स्थान गाठेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.