दिव्यांगासाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर ठरतेय तुमसर ची अशोककला!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गर्रा/बघेडा येथिल दिव्यांग तथा सामाजिक कार्यकर्ता अशोककला जयलाल चौधरी ह्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर ठरत आहेत. त्यांनी दिव्यांग व गोरगरीब सर्व जाती -धर्माच्या लोकांसाठी लोकहितार्थ केलेल्या कामाची पावती म्हणून अशोककला चौधरी हिचा पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

दिव्यांगण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. महिलांना पं.स. महिला बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग भंडारा मार्फत महिलांना शिलाई मशिन मिळवुन देणे. वर्ग ५ ते १० च्या एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. मुलींना पं.स. तुमसर व बालकल्याण विभागा मार्फत दोनचाकी सायकल मिळवुन देणे. दिव्यांगण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. महिलांना पं.स. जिल्हा परिषद व कृषी विभाग पं.स. मार्फत ताडपत्री पाईप व शेतीचे अवजारे इ. योजनेचा लाभमिळवुन देणे. दिव्यागण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. महिलांचे राशन कार्ड बनवुन देणे. दिव्यांगण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. महिलांचे ई श्रम कार्ड बनवुन देणे. दिव्यांगण व गोरगरीब विधवा महिलांना संजय गांधी व अर्थसहाय योजनेचा लाभ मिळवुन देणे. दिव्यांगण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी.तसेच वृध्द महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवुन दिला विधवा महिलांना २० हजार अर्थसहाय मिळवुन दिले. दिव्यागण महिलांचे / पुरुषाचे अपंग प्रमाणपत्र बनवुन दिले. दिव्यांगण महिलांचे /पुरुषाचे युनिक कार्ड प्रमाणपत्र बनवुन देणे. दिव्यागण व गोरगरीब एस.सी./ एस.टी./ एन.टी/ एस.बी.सी/ ओ.बी.सी. महिलांना बांधकाम कामगार मार्फत नविन नोदंणी करुन कार्ड बनवुन दिले. अशा शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गरजु लाभार्थ्यांना मिळवुन देण्याचे काम अशोककला चौधरी यांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *