पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाºया १२ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासनाने जिल्हा परिषदेच्या १८ हजार शाळा बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ, रविवारी तुमसर दौºयावर असलेल्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाºया आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या १२ विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईचा माजी आमदार चरण वाघमारे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. (अकरऋ) जिल्हास्तरीय ‘जनता दरबार’ निमित्त पालकमंत्री तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे २२ मार्च रविवारी तुमसर दौºयावर होते. यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शासनाच्या शाळा बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पालकमंत्र्यांचा ताफा तुमसर शहरातील जुना बस स्थानक परिसरात अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलीस कारवाई आणि कलमे : या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी वैभव चोपकर यांच्यासह १२ विद्यार्थ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत: कलमे : १२६ (२), १२७ (२), १८९ (२), २२१ बिएनएस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा : कलम १३५.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *