
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून उच्च शिक्षणाची सोय, मोठी बाजारपेठ व तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून सर्वच शासकीय, निम शासकीय कार्यालयामुळे कार्यालयीन कामे, खरेदी व शिक्षणासाठी ग्रामीण परिसरातून दररोज हजारो महिला, पुरुष व विद्यार्थी शहरात येत असतात. याश्-िावाय शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) मुळे वाहनांची वर्दळ असते.
शहरात व परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने वाहतूक सुचारू पद्धतीने ह्वावी म्हणून उड्डाणपुलाचे बांधकाम जेएम सी कंपनीकडून करण्यात आले. मात्र उड्डाण पुलावर वारंवार तांत्रिक दोष येत असल्यामुळे वाहतूक उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या मार्गानेच सुरु आहे. त्यातही भरीस भर म्हणून सर्विस रोड सुरु झाल्यापासून ते बसस्थानकापर्यंत सर्विस रोडवर दोन्हीबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याने अतिक्रमणामुळे वाहन चालकास आजूबाजूने येणारी वाहने दिसत नाही. शहरातील वर्दळीच्या बसस्थानक, सिंधीलाईन चौक तथा तहसील कार्यालय परिसरात महामार्गासह सर्व्हिस रोडवर वाहने उभी केली जात असल्यामुळे इतर वाहनांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नियंत्रणाअभावी शहरातीलवाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे.