मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात पारडी शाळा मोहाडी तालुक्यात प्रथम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मोहाडी तालुक्यातून पारडी या शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.आणि पारडी शाळा जिल्ह्यात स्पर्धेत आलेली आहे. स्वत:वर विश्वास आणि इच्छाशक्ती च्या बळावर शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद आणि सहाय्यक शिक्षक शिवराम कात्रे, हरिश्चंद्र पवार आणि भाविका गाढवे यांनी लोकसहभाग आणि पालकांच्या सहकायार्ने अगदी रसातळाला आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रकाशझोतात आणली. सक्षम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरीशंकर आगाशे, उपाध्यक्ष वर्षा पडोळे आणि सर्व कार्यक्षम समिती सदस्यांच्या व पालकांच्या मेहनतीचे मुळे गुणवत्तापूर्ण आणि सुंदर आदर्श शाळेच्या पारडी शाळा दोन वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

शाळेची सुंदर इमारत, बोलक्या वर्गखोल्या, तंत्रज्ञानानाचा वापर करून अध्यापनाची प्रक्रिया, प्रत्येक वर्गात डिजिटल स्मार्ट बोर्ड, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, अनलिमिटेड नेट कनेक्शन, आरोचे शुद्ध शीतल पाणी, सोलर सिस्टम, सीसीटीव्ही, वेस्टर्न आणि इंडियन टॉयलेट, सुसज्ज वाचनालय सारख्या सुसज्ज भौतिक सुविधा शाळेला दोन वर्षात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून पारडी शाळेला उपलब्ध झाल्यात. शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम अध्यापन पद्धती आणि सामान्यज्ञानाची विविध उपक्रम, नियमित गृहअभ्यासाची सवय, इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, शैक्षणिक सहल उपक्रम, विविध सांस्कृतिक बौद्धिक आणि क्रीडास्पर्धांचे नियमित आयोजन, दररोज १०० टक्के उपस्थिती या मुळे पारडी शाळेचे विद्यार्थी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत.त्यामुळे शाळेला भेटी घेण्यासाठी अभ्यासकांची गर्दी उसळत आहे. पारडी शाळेची प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील शाळा विकास साधत आहे. पारडी शाळेत अनेक गावातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी ५८ पटसंख्या असलेल्या पारडी शाळेची आज पटसंख्या १२३ आहे. तसेच आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आसपासच्या गावातून अनेक पालक शाळेला भेटी घेत आहेत. शाळेतील विद्यार्थी बँकेचा उपक्रम लक्ष वेधून घेतो.विद्यार्थी बँकेत विद्यार्थ्यांनी दीड वर्षात सहा लक्ष पेक्षा जास्त रकमेची बचत केली आहे.

विद्यार्थी बँकेचा संपूर्ण व्यवहार विद्यार्थीच सांभाळतात. शालेपयोगी वस्तूंचे भांडार विद्यार्थीच चालवितात. पालक मंडळी दररोज कामावरून परत आल्यानंतर शाळेची स्वच्छता करून देतात. शालेय परसबागेची लागवड आणि देखरेख पालकांच्या द्वारे केली जात असते. शाळेत उपलब्ध असलेली दानपेटी हा पारडी शाळेचा उल्लेखनीय उपक्रम आहे. शाळेमार्फत ग्रामस्वच्छता, वेसनमुक्ती, मुलींचे उद्बोधन यासारखे अनेक सहशालेय उपक्रम नियमित राबविले जात असतात. दोन वर्षापूर्वी दुर्लक्षित असलेली शाळा शिक्षक, पालक आणि समाजाच्या सहकार्याने कशी गुणवत्तापूर्ण आणि आदर्श होऊ शकते याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी हे भंडारा जिल्ह्यातील ज्वलंत उदाहरण आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *