साकोलीच्या डॉ. प्रतीक्षा काशीवार यांची एमडी अ‍ॅनेस्थेशियासाठी निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : साकोली येथील डॉ. प्रतीक्षा काशीवार यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमडी अ‍ॅनेस्थेशिया अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह शैक्षणिक व सामाजिक वतुर्ळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील होतकरू वैद्यकीय विद्यार्थिनी डॉ. प्रतीक्षा काशीवार यांची Government Medical
College Yavatmal (VNMC)येथे एमडी (अ‍ॅनेस्थेशिया) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून उच्च वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. प्रतीक्षा या वसंत कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव/सडक (ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) येथील प्राचार्य के. के. काशीवार यांच्या कन्या आहेत.

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *