भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वन विभाग संबंधी समस्या व विविध परवानग्या देण्याकरिता आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आॅनलाईन उपस्थिती दर्शवीत विधान सभा क्षेत्रातील विविध कामांची मंजूरी मागितली. त्यात विधानसभा क्षेत्रातील वन समस्यांसह क्षेत्रात प्राणी संग्रहालय बनविणे, वन जमिनीवरील आठ गावांचे पुनर्वसन यासह पर्यटनाला चालना मिळावी याकरीता कोका ते नागझिरा करिता लिंक रोड बनविण्याची मागणी मंत्री महोदयांसामोर ठेवली. ज्याला मंजूरी देत वनमंत्री यांनी अधिकाºयांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी विविध विषय मांडतांना मागण्या भंडारा विधानसभा क्षेत्रात जंगलासह आरक्षित व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, अश्यात याकडे पर्यटकांचा ओढ वाढतांना दिसत आहे. ज्यात कोका आणि नागझिरा अभियारण्य लागून असल्याने यांना जोडणारा लिंक रोड झाल्यास भंडारा विधानसभा क्षेत्रातील जंगल क्षेत्राला पर्यटनाची अधिक जोड मिळेल. याच प्रमाणे भंडारा येथे येणाºया पर्यंटकांसाठी गोरेवाडा च्या धर्तीवर मिनी प्राणी संग्रहालय (झू) देण्यात यावा, जेणे करून येथी जंगल क्षेत्रातील प्राण्यांचा वावर वाढवितांना अनेक हातांनारोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत त्या करीता जंगल क्षेत्राला फेन्सिंग चे प्रस्ताव शासन दरबारी पडुन असुन त्यांना तात्काळ मंजूरी प्रदान करून कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जंगल क्षेत्रातील आठ गावांचे पुनर्वसनाच्या प्रस्तावावर मंजूरी ची मोहर लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यासह भंडारा विधानसभा क्षेत्रातील रावनवाडी हे विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असुन पर्यटन विकासा करीता मंजूरी मिळाल्यास क्षेत्राच्या विकासाला चालना मिळू शकेल अशी अपेक्षा वर्तवित मंजूरी देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे विविध कारणांनी जखमी होणारे किंवा संक्रमित होणाºया वन्य जीवांच्या उपचार करीता वन विभागात ट्रांजेंट ट्रीटमेंट सेंटर ची मागणी करण्यात आली. या सेंटर ला लवकरात लवकर मंजूरी देण्याची मागणी आम. भोंडेकर यांनी केली. वरील सर्व मागण्या मंजूर करून वनमंत्री यांनी यावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.