लाखनी पं.स.सभापतीवर अविश्वास प्रस्ताव दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : स्थानिक पंचायत समितीच्या सभापती अश्विनी मोहतुरे यांच्या विरोधात पंचायत समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सभापती अश्विनी मोहतुरे यांच्या कार्यपद्धती बाबत पंचायत समिती सदस्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ६७ अन्वये अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे . प्रस्ताव दिलेल्या कारणामध्ये पंचायत समितीच्या कारभारात पार- दर्शकतेचा अभाव, पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फा निर्णय घेणे, विकासकामांच्या नियोजन व अंमलबजावणीत हलगर्जीपणा , शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, निधीचे योग्य नियोजन व न्याय वितरण न करणे, जनहिताच्या प्रश्नांबाबत अपेक्षित कार्यवाही न करणे ही कारणे निवेदनात दिलेली आहेत. पंचायत समितीच्या ११ सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षºया केल्या आहेत. यात उपसभापती सुनील बांते, पंचायत समिती सदस्य गिरीश बावनकुळे, विकास वासनिक, रवींद्र खोब्रागडे , सुरेश झंझाड, किशोर मडावी, सविता राघोर्ते, मनीषा हलमारे, योगिता झलके, शारदा मते, प्रणाली सार्वे, यांचा सहभाग आहे. लाखनी पंचायत समितीत १२ सदस्य आहेत. यात काँग्रेसचे ६,भाजपचे ५ व अपक्ष १ असे सभासद आहेत. मोहतुरे यांचा १० महिन्याचा कालावधी उरलेला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *