दिवसा ८ तास वीज फक्त नावालाच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : एकीकडे शासनाकडून शेतकºयांना दिवसा वीज देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दिवसा ८ तास वीज देऊन काय फायदा? त्यातले २-३ तास तर फक्त ‘फेज’ उडण्यात आणि ‘ट्रिपिंग’ मध्येच जातात, असा संतप्त सवाल आता शेतकरी बांधव विचारत आहेत. कमी दाबाचा फटका; मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले… शेतकºयांनी मांडलेल्या तक्रारीनुसार, दिवसा मिळणाºया वीज पुरवठ्यात अजिबात ‘करंट’ (व्होल्टेज) नसतो. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतातील विद्युत पंप पुरेसे पाणी खेचू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर, वारंवार होणाºया चढ-उतारामुळे महागड्या मोटारी जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकºयांना दुहेरी आर्थिक फटका बसत असून हाताशी आलेले पीकडोळ्यादेखत करपून जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *