राज्यातील पोलिस कर्मचाºयांची पदोन्नतीने होणारी नियुक्ती रखडली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यातील २५० पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर तातडीने पदोन्नती देण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर करीत महसूल संवर्ग मागण्यात आला होता. मात्र, जवळपास दीड महिन्यांपेक्षा जास्त अवधी उलटल्यानंतरही पोलिस कर्मचारी उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य पोलिस विभागाकडून २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस हवालदारांची मोठी संख्या आहे.त्यापैकी आतापर्यंत तीन ते चार हजार कर्मचाºयांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२५ रोजी आस्थापना विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक सुप्रीया पाटील यादव यांनी २५० पोलिस हवालदारांची यादी जाहीर केली. त्यात अवघ्या एका दिवसात तातडीने संवर्ग भरुन मागण्यात आलाहोता. त्यामुळे राज्यातील अडीचशे पोलिस हवालदारांना आनंद झाला होता. पोलिस कर्मचाºयांनी महसूल संवर्ग भरुन दिला होता. नियमानुसार संवर्ग मागितल्यानंतर एका महिन्याच्या आत पदोन्नतीसह नियुक्तीची यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, पोलिस हवालदारांना जवळपास दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही पदोन्नती मिळण्याची प्रतीक्षाच आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस हवालदारांना पदोन्नती देण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभाग गृहमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *