डॉ. बाजपेयीच्या रुग्णालयाची मान्यता रद्द होण्याची शक्यता!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: दहा दिवसाच्या मुलीच्या विक्री प्रकरणात आता नवनवीन खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. या प्रकरणात आता मुख्य आरोपी असलेल्या डॉ. नितेश बाजपेयी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिव्याखाली अंधार असताना याच डॉक्टराने गोंदियाच्या एका जिल्हा शल्यचिकित्सकांच्या विरोधात कधीकाळी अवैध गर्भपात केंद्राला परवानगी आणि इतर विषयांना घेऊन रान उठवले होते. दरम्यान आरोपी डॉक्टर बाजपेयी अटकपूर्व जामिनासाठी धडपडत आहे. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनार सुनावणी बाकी असल्याने, आज १३ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारल्या नंतर आरोपीने अर्ज मागे घेतला आहे.

गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटल अँड सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांचे प्रकरण उघडकीस १० दिवसाच्या मुलीच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आणखी काही गोष्टी पुढे येताना दिसत आहेत. या प्रकरणातील बाळ विकत घेणाºया महिलेने बाळ दत्तक घेण्याच्या दृष्टीने महिला व बालकल्याण कार्यालयाकडे विचारपूस करूनमाहिती गोळा केली. मात्र ही प्रक्रिया नियमानुसार होणारी असल्याने कदाचित बाळ विकत घेण्याचा हा चुकीचा मार्ग तीने स्वीकारला अस- ावा. या प्रकरणातील अटक असलेल्या महिलेच्या गुगल पे क्रमांकावर विकत घेणाºया महिलेने ९८ हजार वळते केले. १ लाखाची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली, तर उर्वरित १ लाख रुपये ज्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आले, त्या दिवशी जन्माचा दाखला तयार झाल्यानंतर दिले जाणार होते, अशी विश्वसनीय माहिती आहे.

मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर बाजपेयी यांच्या विरोधात गोरेगाव विनापरवानगी दवाखाना सुरु केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचीही माहिती आहे. त्याच्या असलेल्या पदव्यांविषयीही शंकाचउपस्थित केली जात आहे. दरम्यान स्वत: एवढा मोठा पराक्रम करणाºया डॉ. बाजपेयी याने गोंदियाचे यापूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक मोहबे यांच्याविरुद्ध आंदोलन करून रान उठवले होते. मृत व्यक्तींना फिटनेस प्रमाणपत्र, अवैध गर्भपात आणि अवैध नर्सिंग होमला परवानगी दिल्याचा आरोप करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. आज त्यामागचे कारण उघड होत आहे, असे म्हणता येऊ शकते. त्यामुळे पोलिस तपासात या सर्व बाबी उघड होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान या अनुषंगाने गोंदियाचे जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांच्याशी संपर्क केला असता डॉ. बाजपेयी यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने रुग्णालयाची नोंदणी तात्पुरती रद्द केली जाईल असे ते म्हणाले. त्यांच्या पदवी संदर्भातही संभ्रम असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *