वरोरा (आनंदवन) येथे राज्य क्रीडा स्पर्धेत AHPS साकोलीचा डंका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली/भंडारा : AcademicHeights Public School Sakoli(AHPS) साकोलीच्या विद्यार्थ्यांनी वरोरा (आनंदवन) येथे पार पडलेल्या राज्य टेनिस बॉल क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डी चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि भंडारा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट गटात अऌढर साकोलीच्या संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. संघाचे नेतृत्व कर्णधार आयुष मुंगूलमारे यांनी केले. संघातील इतर खेळाडूंमध्ये विहान कापगते, मोहित बतखल, मंथन मुंगमोडे, आहण घोडसेलवार, शौर्य राणे, दक्ष गुंगोनिवार, कुणाल हातझाडे, जारून कुरेशी, गिरीश रोकडे आणि सोमेश जाधव यांचा समावेश होता.

या स्पर्धेत आयुष मुंगूलमारे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘मॅन आॅफ द मॅच’ (सर्वोत्तम खेळाडू) पुरस्काराने गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेतही १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अऌढर संघाने प्रथम क्रमांक मिळवला. भंडारा जिल्हा संघात शाळेचे प्रिन्स हुकरे आणि उत्कर्ष कापगते (गोलकीपर) यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. तसेच कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अऌढर च्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला. भंडारा संघात कु. पलक वासनिक आणि कु. रिद्धी गायकवाड यांनी दमदार खेळ सादर केला. ही राज्यस्तरीय स्पर्धा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंदवन, वरोरा येथे पार पडली. विजयी खेळाडूंची मे महिन्यात होणाºया राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक डॉ. राजेश चंदवानी, व्यवस्थापक जी. एच. ठाकरे, प्राचार्य डॉ. संचिता ब्रह्मचारी, अमीतोज कौर, क्रीडा शिक्षक प्रवीण कठाने तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *