पोलीस स्टेशन मोहाडी येथे वार्षिक निरीक्षण कार्यक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा जिल्हा पोलीस वार्षिक कार्यक्रम अंतर्गत पोलीस स्टेशन मोहाडी येथे वार्षिक निरीक्षण कार्यक्रम सोमवार दि.१६ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले.आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन हे होते. प्रास्ताविकातून मोहाडी पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील रेतीमाफियावर आणि अवैध व्यवसायवर वर्षेभरात केलेल्या कार्यवाहीची माहीती दिली. प्रमुख मार्गदर्शन करतांना नूरल हसन म्हणाले जो कोणी गुन्हा करेल तो आमच्यासाठी सर्वात वाईट माणूस असेल. प्रत्येक गुन्ह्याची सूचना, माहिती पोलिसांना द्या, गुन्ह्यावर आळा घालण्याची जबाबदारी आमची राहील.

नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे व गुन्हेमुक्त वातावरणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत उपस्थिततांना व्हॉटसअप क्रमांक सेव्ह करण्यासाठी सांगण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे, मोहाडीचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे उपस्थित होते. अवैध रेती, जुगार, दारू व गांजा यांसारख्या बेकायदेशीर व्यवसायांविरोधात भंडारा जिल्ह्यात अभूतपूर्व कारवाई करण्यात आली. सामान्य जनतेने पोलिसांवर विश्वास ठेवून सहकार्य केल्यास गुन्हेगारीवर पूर्ण आळा घालता येईल. सामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारी गांभीयार्ने घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही भंडारा पोलिस प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन हा मोठा आणि गंभीर विषय असला, तरी महसूल विभागाचे कार्यक्षेत्र असतानाही पोलिस विभागाने गेल्या १५ महिन्यांत २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची कारवाई केली आहे. भंडारा जिल्ह्यात २०२३ ते २०२५ या कालावधीत रेती चोरीविरोधातील कार- वाईत मोठी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये २२३ प्रकरणांची नोंद झाली असून, जप्त व संबंधित रक्कम ३२ कोटी ३३ लाख २५ हजार २०० इतकी आहे. २०२४ मध्ये ३३० प्रकरणे नोंदविण्यात आली असून,जप्त व संबंधित रक्कम ५४ कोटी ३४ लाख ६० हजार २०० झाली आहे.

भंडारा पोलिस दल यांनी २०२३ ते २०२५ या कालावधीत तंबाखू-गुटखा, हद्दपार प्रकरणे, एमपीडीए व अमली पदार्थ कारवाईत सातत्याने वाढ नोंदवली आहे. तंबाखूगुटखा कारवाई २०२५ मध्ये ३० वर पोहोचली असून, हद्दपार प्रकरणे ५४ वरून १८० पर्यंत वाढली आहेत. एमपीडीए अंतर्गत २०२४ मध्ये मोठी वाढ दिसून आली तर एनडीपीएस प्रकरणांमध्ये दरवर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळत असून, असे धंदे पूर्णपणे बंद करायचे असतील तर नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांना माहिती द्यावी.

नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याचे नूरल हसन यांनी याबाबत सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांनीही मार्गदर्शन केले.तत्पूर्वी खैरी येथील सेवानिवृत्त पोलिस पाटील पुरुषोत्तम ईश्वरकर यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच,पोलिस पाटील संघटना व हिंदुत्व समर्पण ग्रुप मोहाडीच्या वतीने शुभम माहुरकर, रूपेश गाठे, धीरज चौधरी, कुलदीप दिपटे, शिवम ढोमणे यांनी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, राजू बांते, सिराज शेख, नितिन लिल्हारे, ज्योती चिंधालोरे, प्रतिभा समरीत, रागिणी सेलोकर, कौशल्या निखारे, संजू गोसेवाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पोलिस पाटील पंढरी झंझाड व अश्विनी भोयर चारगाव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपनिरीक्षक राहुल चौधरी यांनी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *